अकोले तालुक्यातील आदिवासी भागात गेली ३० वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून वश्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उपेक्षित ,गरीब , आदिवासी विध्यार्थ्यानी शिक्षण घ्यावे मनात उर्मी असणारे शांताराम बापू काळे व त्यांच्या सुविध्य पत्नी प्राचार्या सौ . मंजुषा काळे यांचा आज लग्नाचा २८ वा वाढदिवस आहे . बापूंची कारकीर्द तशी वादळीच पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी , ऊस कामगार , बिडी कामगार , शेतमजूर ,शिक्षक , अधिकारी , महिला युवक , संस्था , सामाजिक कार्यकर्ते ,राजकीय पुढारी यांच्याबाबत लिखाण करून योग्य कामाला प्रसिद्धी दिलीच परंतु चुकीच्या कामाबाबत वृत्तपत्रातून समज हि दिली त्यामुळे ते सर्वच क्षेत्रात आपले वाटू लागले .पत्रकारिता करताना अनेक संकटे येऊनही ते डगमगले नाही , कधी कधी राजकीय रागही अंगावर ओढून घेतला मात्र ज्यांच्यासाठी ते काम करतात त्यांनीही पाठ फिरवली तरी जिद्द व चिकाटी आत्मविश्व्साच्या जोरावर ते सामाजिक प्रश्न सोडवतच राहिले हजारो विधार्थी त्याच्या शाळेतून शिकून गेले आज ते अधिकारी प...